Asia Cup: आशिया कपमध्ये कोणाची संभाव्य प्लेइंग 11 जास्त मजबूत, पाकिस्तानचे 4 खेळाडू टीम इंडियावर भारी?

आशिया कप 2025 (Asia Cup) ची सुरुवात 9 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे. या स्पर्धेत सगळ्यांच्या नजरा टीम इंडियावर (Team india) असणार आहेत. पाकिस्तानच्या स्क्वाडमध्ये बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohmmed Rizwan) यांना स्थान न मिळणे ही धक्कादायक बाब ठरली आहे. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 14 सप्टेंबरला सामना खेळवला जाणार आहे. त्याशिवाय सुपर-4 आणि अंतिम सामन्यातही या दोन देशांची भिडंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणता संघ जास्त मजबूत दिसत आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे.

आशिया कपसाठी (Asia Cup) दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. टीम इंडियामध्ये शुबमन गिलची (Shubman gill) उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे, तर पाकिस्तानने मोठा निर्णय घेत रिझवान आणि बाबरला संघाबाहेर ठेवलं आहे. दोन्ही देशांच्या संभाव्य प्लेइंग 11 कडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. न्यूज 24 ने स्वतःची संभाव्य प्लेइंग 11 जाहीर करून तुलना केली, त्यानुसार 7 भारतीय खेळाडू पाकिस्तानपेक्षा जास्त प्रभावी दिसत आहेत, तर शेजाऱ्यांच्या 4 खेळाडू भारताच्या खेळाडूंवर भारी पडत आहेत.

Comments are closed.