IndiGo ची उड्डाणे रद्द! सेलिब्रिटींनाही बसला फटका, सोनू सूदने व्यक्त केला संताप

‘नागरी विमान वाहतूक संचालनालयाने’ (डीजीसीए) सुरक्षेसंदर्भात लागू केलेल्या नव्या नियमांमुळे इंडिगो एअर लाइन्सच्या स्टाफने संप पुकारला. त्यामुळे ‘इंडिगो’ ची सेवा कोलमडली आणि विमान कंपनीसह प्रवाशांनाही मोठा फटका बसला आहे. सामान्य नागरिपांसून ते सेलिब्रिटींसह प्रत्येक जण सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहे. अभिनेता सोनू सूद, जय भानुशाली, राहुल वैद्य आणि अली गोनी यांसारख्या कलाकारांनी IndiGo बद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“उशीर होणारी उड्डाण निराशाजनक आहे, परंतु ते निराकरण करण्याचा प्रयत्न करणारे चेहरे लक्षात ठेवा. कृपया इंडिगो कर्मचाऱ्यांशी नम्र आणि नम्र वागा; ते रद्द करण्याचा भार देखील उचलत आहेत. चला त्यांना पाठिंबा देऊया.” @IndiGo6E pic.twitter.com/rd3ciyekcS
— सोनू सूद (@SonuSood) 6 डिसेंबर 2025
अभिनेता सोनू सूद नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. देशभरात सुरू असणाऱ्या घडामो़डींबाबत नेहमी प्रतिक्रिया व्यक्त करतो. आता देखील सोनू सूद याने ‘इंडिगो’ बाबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ‘इंडिगो’ची उड्डाणे रद्द होत आहेत. यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांचा पारा च़ढणे स्वाभाविक आहे. माझ्या परिवारालाही याचा त्रास झालाय. मात्र दुख: याच वाटतय की लोक तेथील स्टाफवर भडकले आहेत. आणि हे चूकीच असल्याचे सोनू सूदने नमूद केले.
इंडिगोचा ग्राऊंड स्टाफ तेथील परिस्थितीचा सामना करतोय. IndiGo स्टाफसोबत कृपया विनम्रपणे वागा. ते देखील हा त्रास सहन करत आहेत. आपण त्यांना पाठिंबा देऊ या. त्यांना सहकार्य करू या, असे सोनू सूद यावेळी म्हणाला. यासोबतच अभिनेता अली गोनीने देखील व्हिडिओ शेअर करून ग्राउंड स्टाफसोबत गैरवर्तन न करण्याची विनंती केली आहे.
घडलेल्या प्रकारांवर इंडिगोने दिलगीरी व्यक्त केली आहे. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोला मोठ्या प्रमाणात ऑपरेशनल आव्हानांचा सामना करावा लागला आहे, परंतु कंपनी सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
इंडिगोच्या सीईओंकडून दिलगिरी, 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन

Comments are closed.