IndiGo Flight Disruptions – इंडिगोचं काय झालं? केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावं आणि चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

इंडिगोमध्ये जे काही घडलं त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणी केंद्र सरकारने संसदेत अधिकृत निवेदन दिले पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली. कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत, कुणाच्या कुटुंबात नातलगाचे निधन झाले आहे तर कुणाला लग्नासाठी जयाचं असेल, आपण पाहतोय गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या प्रकरणी केंद्र सरकारकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. संसद सुरू आहे पण सरकारकडून एक शब्दही काढण्यात आलेला नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
व्हिडिओ | इंडिगो विमानातील व्यत्ययावर, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) खासदार सुप्रिया सुळे (@supriya_sule) म्हणतात, “IndiGo सोबत जे काही घडले आहे त्याचा आम्ही निषेध करतो. भारत सरकारने संसदेत अधिकृत निवेदन द्यावे, आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. फक्त परिस्थिती पहा… pic.twitter.com/oP8cSqUy7v
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 6 डिसेंबर 2025
सोमवारी संसदेत यावर चर्चा घ्यायला हवी. आणि या प्रकरणी केंद्र सरकारने देशाला आणि संसदेला स्पष्टीकरण द्यावं की, इंडिगोचं काय झालं? अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. चार पाच एअरलाइन्स असत्या तर इंडिगोमुळे प्रवाशांचे जे हाल झाले ते झाले नसते. कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यास कस्टमर हा किंग असतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Comments are closed.