इंदिरा गांधी हा हातोडा नाही, तर युधाविरामन कॉंग्रेसने कॉंग्रेसच्या आक्रमक, अप्पर द मोदी सरकारने वेगळ्या केले.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावजन्य परिस्थितीत भारताने 7 मे रोजी मध्यरात्री एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation sindoor) माध्यमातून भारताने 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यात पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून हवाई हल्ले करण्यात आले. त्यामध्ये, 30 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सीमारेषेवरील गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन युद्धविराम झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाया थांबल्या आहेत. एकीकडे भारताने पाकिस्तान नरमला आणि युद्ध थांबलं म्हणून मोदी सरकारचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या 1771 च्या आठवणी जागवल्या जात आहेत. इंदिरा होना आसान नही… असे म्हणत काँग्रेसकडून (Congress) इंदिरा गांधीचे जुने व्हिडिओ व फोटो शेअर केले जात आहेत.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेशची निर्मिती झाली होती. या ऐतिहासिक घटनेच्या शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखले जाते. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आलेल्या फोन कॉलनंतर भारताने याबाबतची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य दलाच्या कारवाई थांबल्याची घोषणा होताच, काँग्रेसकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. इंदिरा गांधींनी 1971 च्या युद्धावेळी घेतलेल्या कणखर भूमिकेची आठवण करुन दिली जात आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया सिनेट यांनी ट्विट करत इंदिरा होना आसान नही.. असे म्हटले. तर, इंदिरा गांधींच्या जुन्या व्हिडिओ आणि फोटोंसह 1971 च्या युद्धावेळच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे, ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंदिरा गांधी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

इंदिरा गांधींचे लष्करप्रमुखांना आदेश

1971 साली एक संधी चालून आली आणि त्याचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. 25 एप्रिल 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एका बैठकीत भारताच्या लष्करप्रमुखांना आदेश दिला की, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जर युध्द करावे लागले तरी ते करावे. पुढच्या परिणामांची काळजी करु नये. इंदिरा गांधींना हा असा आदेश द्यावा लागला होता कारण भारताच्या पूर्व भागातील पाकिस्तानमध्य़े, म्हणजे आताच्या बांग्लादेशमध्ये अशा काही घडामोडी घडत होत्या की त्याचा थेट परिणाम भारतावर होत होता.

इंदिरा गांधींचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही दबदबा

इंदिरा गांधींचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न नेमके काय होते? या प्रश्नावर अमेरिकेच्या राष्ट्रीय सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत इंदिरा गांधींनी त्यांना ठामपणे सांगितले की जर अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. पूर्व पाकिस्तानचा प्रश्न ही पाकिस्तानची अंतर्गत गोष्ट आहे असे पाकिस्तान सातत्याने सांगत होते. पण इंदिरा गांधींनी स्पष्ट केले की हा प्रश्न पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न नाही. त्यामुळे भारतातील अनेक राज्यांची शांतता भंग होतेय.

हेही वाचा

युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही; शस्त्रसंधीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं

अधिक पाहा..

Comments are closed.