इंडोनेशिया ब्रह्मोस क्षेपणास्त्रे घेणार
भारताशी केला 20 ते 35 कोटी डॉलर्सचा करार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताकडून अत्याधुनिक ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा निर्णय इंडोनेशिया या देशाने घेतला आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात तसा करारही झाला आहे. तो देश त्याच्या सेनादलांचे आधुनिकीकरण करत असून या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हा करार करण्यात आला आहे, अशी घोषणा इंडोनेशियाने केली.
इंडोनेशियाचे संरक्षणमंत्री रीको रिकार्डो सिराईत यांनी सोमवारी या कराराची माहिती दिली. 2023 पासून भारताची या व्यवहारासंबंधी या देशाची चर्चा होत होती. हा करार 20 कोटी ते 35 कोटी डॉलर्सचा (साधारणत: 1 हजार 850 कोटी रुपये ते 3 हजार 200 कोटी रुपये) आहे. तथापि, नेमकी मूल्य स्पष्ट करण्यास सिराईत यांनी नकार दिला आहे. या क्षेपणास्त्रांची निर्मिती ‘ब्राम्होस’ या कंपनीकडून केली जाते. ही कंपनी भारत आणि रशिया यांच्या सहस्वामित्वातील आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्रांचा प्रथम ग्राहक फिलिपाईन्स हा आहे. या क्षेपणास्त्रांना अनेक देशांकडून मागणी आहे, अशी माहिती भारताकडून देण्यात आली आहे.
‘सिंदूर अभियानात’ अजोड पराक्रम
या क्षेपणास्त्र व्यवस्थेने ‘सिंदूर अभियाना’त अजोड पराक्रम गाजविला आहे. या क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ आणि पाकिस्तानच्या वायुतळांवर प्रचंड हल्ला चढविला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या वायुतळांची आतोनात हानी झाली होती. पाकिस्तानची रडार यंत्रणा उध्वस्त झाली होती. इतकेच नव्हे, पाकिस्तानची अण्वस्त्रे जेथे साठविलेली आहेत, त्या किराना टेकड्यांवरही या क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ही क्षेपणास्त्रे अचूक आणि विनाशकारी हल्ल्यांकरिता प्रसिद्ध आहेत. ‘सिंदूर अभियाना’तील पराक्रमामुळे या क्षेपणास्त्रांची ख्याती जगभरात पसरली. तेव्हापासून मागणी वाढत आहे.
ब्राम्होस काय आहे…
‘ब्राम्होस’ हे स्वनातीत वेगाने ह्ल्ला करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या 2.8 पट ते 3 पट अधिक आहे. ते जगातील अशा प्रकारच्या सर्वात आधुनिक आणि प्रभावी क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. ते भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ मशिनोस्ट्रोयेनिया यांनी संयुक्तरित्या विकसीत केलेले आहे. भारतातील ब्रम्हपुत्रा आणि रशियातील मोस्काव्हा या दोन नद्यांवरुन ‘ब्रम्होस’ हे नाव निर्माण झाले, अशी माहिती देण्यात येते. ते भूमी, सागरी पृष्ठभाग, पाणबुड्या आणि युद्ध विमाने या सर्वांवरुन ते डागता येते. या क्षेपणास्त्राचा मूळ पल्ला 290 किलोमीटर असून ते अत्याधुनिक रडार व्यवस्थेलाही चकवा देऊ शकते. त्यामुळे ते अधिक प्रभावशाली असल्याचे मानले जात आहे.
भविष्यकाळातील प्रगत आवृत्त्या
या क्षेपणास्त्रामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत असून ते आधीपेक्षा अधिक प्रभावी आणि अधिक पल्लेदार करण्यात येत आहे. त्याचा वेग वाढविण्यात येत असून तो 7 ते 8 मॅक, अर्थात ध्वनीच्या वेगापेक्षा सात ते आठ पट अधिक करण्यात यश आले असून अशी वेगवान ब्राम्होस क्षेपणास्त्रे लवकरच भारतीय सेनेत समाविष्ट केली जाणार आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.
ठळक वैशिष्ट्यो
ड अचूक आणि वेगवान लक्ष्यभेद, रडारवर न दिसण्याची क्षमता
ड क्षेपणास्त्राचा वेग 2.8 ते 3 मॅक, ध्वनीवेगापेक्षा तीन पट जास्त
ड सध्याचा पल्ला 290 किलोमीटर्स, 300 ते 450 पर्यंत प्रयत्न
ड अवघ्या 15 मीटर उंचीवरुन लक्ष्यभेद करण्याचे त्याचे सामर्थ्य
ड अनेक देशांकडून या क्षेपणास्त्रांना मागणी, दोन देशांशी करार
Comments are closed.