Indrajit Sawant spreding misinformation on yuotube says karni sena allegations


मुंबई : देशभरात छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर समोर ठेवलेल्या इतिहासाबद्दल अनेक वाद निर्माण झाले. त्यानंतर प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले. त्यांनतर आता इंद्रजीत सावंत यांच्याविरोधात करनी सेना आक्रमक झाली असून इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी करनी सेनेने आरोप केले आहेत की, इंद्रजीत सावंत त्यांच्या युट्युब चॅनलद्वारे खोटी माहिती पसरवत आहेत. त्यामुळे एकीकडे इंद्रजीत सावंत यांच्या धमकीचे प्रकरण सुरू असताना दुसरीकडे करनी सेनेने केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. (Indrajit Sawant spreding misinformation on yuotube says karni sena allegations)

हेही वाचा : Manoj Jarange : मनोज जरांगे पाटली यांची प्रकृती बिघडली; संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल 

करनी सेनेचे हे आरोप

करनी सेनेच्या वतीने, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. करनी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांन्देश्वर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला. ‘इतिहासकार इंद्रजीत सांवत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्या विरोधात यु-ट्यूब चॅनलमध्ये चुकीची माहिती पसरवत आहेत, असा गंभीर आरोप सेंगर यांनी केला. वारंवार ब्राम्हण आणि राजपूत समाजाविरोधात इंद्रजीत सावंत यांच्याकडून विधाने करण्यात आली आहेत. विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत असल्यामुळे त्यांच्यामुळे समाजात दुही माजवली जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करनी सेनेद्वारे करण्यात आली आहे.

इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण

काही दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला होता. यावेळी फोनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. इंद्रजीत सावंत यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत कोरटकर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर पोलिसात तक्रार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी हा आवाज आपला नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, त्यानंतर ते फरार झाल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी कोरटकर यांनाही अनेकांकडून धमकी देण्यात आली. सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. त्यामुळे, प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना धमक्या येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



Source link

Comments are closed.