कॅप्टन सूर्याला मोठा विक्रम करण्याची संधी, होईल विराट-रोहितच्या ‘या’ लिस्टमध्ये एंट्री
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना २१ जानेवारीला नागपूर येथे खेळला जाणार आहे. यामध्ये भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
सूर्यकुमारला टी२० क्रिकेटच्या इतिहासात ९००० धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. यासाठी त्याला केवळ २५ धावांची गरज आहे. ही कामगिरी करताच तो टी२० क्रिकेटमध्ये ९००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा चौथाच भारतीय खेळाडू ठरणार आहे.
टी२० क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पा भारताच्या तीन खेळाडूंनी गाठला आहे. यामध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने टी२०मध्ये १३५४३ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर रोहित शर्माचा क्रमांक लागतो. त्याने १२२४८ धावा केल्या आहेत. शिखर धवन ९७९७ धावा करत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
मागील काही सामन्यांमध्ये सूर्यकुमारची कामगिरी पाहिली तर तो धावा करण्यात अपयशी ठरला आहे. विश्वचषकापूर्वी ही मालिका होत असल्याने तो फॉर्ममध्ये परतावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याने टी२० कारकिर्दीत आतापर्यंत ३४६ सामन्यांत ३४.७८च्या सरासरीने ८९७५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ शतके आणि ५९ अर्धशतके केली आहेत.
सूर्यकुमारने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून अनेक सामन्यात तुफानी खेळी केली आहे. तसेच त्याने भारताकडूनही अनेक सामन्यांत विजयी मोठ्या खेळी केल्या आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी पहिल्या तीन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर याला संघात संधी दिली आहे. त्याला तिलक वर्माच्या अनुपस्थितीत संघात घेतले आहे.
टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले ५ भारतीय खेळाडू
1. विराट कोहली – 13543 धावा (414 धावा)
2. रोहित शर्मा – 12248 धावा (463 धावा)
३. शिखर धवन – ९७९७ धावा (३३४ समोर)
४. सूर्यकुमार यादव – ८९७५ धावा (३४५ समोर)
५. सुरेश रैना – ८६५४ धावा (३३६ समोर)
Comments are closed.