INDW vs AUSW: टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर विराट भारावला; पाहा नेमकं काय म्हणाला ….

महिला विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने एकही सामना गमावला नव्हता आणि ऑस्ट्रेलिया सात वेळा विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने 2022 मध्ये महिला विश्वचषक जिंकला होता. भारताच्या विजयाबद्दल सर्व दिग्गज क्रिकेटपटूंनी टीम इंडियाचे अभिनंदन केले. आता, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. वर्ल्डकप उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली संघाला पराभूत केल्याबद्दल विराटने टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्याने मॅचविनर जेमिमा रॉड्रिग्जच्या फलंदाजीचेही कौतुक केले.

विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघावर आमचा किती अद्भुत विजय आहे. मुलींनी शानदार पाठलाग केला आणि जेमिमाने या मोठ्या सामन्यात अपवादात्मकपणे चांगली फलंदाजी केली. हे दृढनिश्चय, विश्वास आणि उत्कटतेचे खरे प्रदर्शन आहे. शाब्बास, टीम इंडिया.”

महिला विश्वचषक उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 339 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला नव्हता. परंतु जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या दमदार फलंदाजीमुळे आणि संपूर्ण संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे लक्ष्य 9 चेंडू शिल्लक असताना साध्य झाले. ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.

Comments are closed.