पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO
भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक 2025: महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर 88 धावांनी विजय (INDW vs PAKW) मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 247 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 248 धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग 12 वेळा विजय मिळवला आहे. भारत या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे.
भारत आणि पाकिस्तान महिलांच्या या एकदिवसीय सामन्यात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि पाकिस्तानची फिरकी गोलंदाज नशरा संधू (Nashra Sandhu) यांच्यात मैदानावर बाचाबाची झाली. यावेळी नशरा संधूने हातवारे केले, तसंच डोळ वटारुन हरमनप्रीत कौरला बघत होती. यानंतर हरमनप्रीत कौर देखील तिच्याकडे बघत राहिली. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? (Harmanpreet Kaur Nashra Sandhu Video)
हरमनप्रीत कौर फलंदाजी करत असताना 22 व्या षटकांत पाकिस्तानकडून फिरकीपटू नशरा संधू गोलंदाजीसाठी आली. हरमनप्रीतने चेंडू खेळल्यानंतर तो गोलंदाजी करत असलेल्या नशरा संधूच्या हातात गेला. यावेळी नशरा संधूने तिला डोळे वटारुन पाहिले. यानंतर हरमनप्रीत कौरनेही तिला प्रत्युत्तर दिले.
******* आंख दिखती है 🤣🤣🤣
#Indwvpakw #INDVSPAK2025 pic.twitter.com/7my0a7mm3j
– पॅन इंडिया पुनरावलोकन (@Panindindiarevie) 5 ऑक्टोबर, 2025
चेहरा काय आहे? (भारत महिला पाकिस्तान महिलांवर विजय मिळविते)
पाकिस्तान संघाचे नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं 50 ओव्हरमध्ये 247 धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा हरलीन देओल हिनं केल्या. तिनं 46 धावा केल्या. पाकिस्तानकडून बैग आणि सना यांनी 2-2 विकेट घेतल्या. 247 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मनीबा अली रन आऊट झाली. सदफ शमास 6 धावा करुन बाद झाली. क्रांति गौड हिनं 3 विकेट घेतल्या. आळिया रियाझ 2 धावा करुन बाद झाली. नतालिया परवेझनं 46 धावा केल्या. कॅप्टन फातिमा सना केवळ 2 धावा करु शकली. सिदरा नवाज हिनं 14 धावा केल्या सिद्रा अमीन हिनं 81 धावांची खेळी केली. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना 23 धावा करुन बाद झाली. प्रतिका रावलनं 31 धावा केल्या. हरमनप्रीत कौर 19 धावा करु शकली. हरलीन देओलनं 46 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं 32 तर स्नेह राणानं 20 धावा केल्या. रिचा घोषनं 35 धावा केल्या.भारताकडून क्रांती गौडनं 3 विकेट घेतल्या. दिप्ती शर्मानं 3 आणि स्नेह राणानं 2 विकेट घेतल्या.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.