भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन ट
INDW vs SAW वर्ल्ड कप फायनल 2025 हरमनप्रीत कौर: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात (INDW vs SAW World Cup Final 2025) भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (India beat South Africa Women World Cup 2025 Final) 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. पूर्वी, फक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनेच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महिला एकदिवसीय क्रिकेटला शेवटचा नवीन विजेता 2000 मध्ये मिळाला होता, जेव्हा न्यूझीलंडने जेतेपद पटकावले. त्यापूर्वी आणि तेव्हापासून, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विजेते राहिले आहेत. आता 25 वर्षांनंतर, महिला एकदिवसीय क्रिकेटला भारतात एक नवा विजेता मिळाला आहे.
📽️ कच्च्या प्रतिक्रिया
शुद्ध भावना ❤️
क्षण जेव्हा #WomenInblue जिंकून इतिहास रचला #CWC25 अंतिम 🥳#TeamIndia pic.twitter.com/5jV4xaeilD
— BCCI महिला (@BCCIWomen) 3 नोव्हेंबर 2025
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हरमनप्रीत कौरला भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सगळ्यात जास्त शिव्या मीच देते, असं उत्तर हरमनप्रीत कौरने दिलं.
भारताचं जोरदार सेलिब्रेशन- (Indian Womens Team Celebration ICC World Cup 2025)
आयसीसी विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन (Indian Womens Team Celebration Video) केले. सर्व खेळाडूंसह संघाचे सर्व प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांनी मैदानात येत एकमेकांना मिठी मारल्या. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्याकडून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषकाची ट्रॉफी देण्यात आली. जय शाह यांच्याकडून ट्रॉफी मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौर नव्या स्टाईलनं अॅक्शन करत ट्रॉफी घेऊन इतर भारतीय खेळाडूंकडे गेली आणि ट्रॉफी उंचावली. यावेळी मैदानात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) उपस्थित होता. रोहित शर्मानेही भारतीय महिला खेळाडूंचं सेलिब्रेशन पाहिले. (Indian Womens Team Celebration ICC World Cup 2025)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.