मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे कळते.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही इनोव्हा कार मुंबईहून जगन्नाथपुरीकडे निघाली होती. मात्र समृद्धी महामार्गावर वाशिम जवळच्या मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडॉर क्रमांक 232 जवळ कारचा भीषण अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याच्या कडेचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर कारच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात दोन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेतली आहे

Comments are closed.