इन्स्टाग्राम प्रभावक प्रीत जट्टीला धमकी दिली
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर कमल कौरचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला होता. याप्रकरणी अमृतपाल सिंह मेहरोंवर हत्येचा आरोप झाला ओ. कमलच्या हत्या प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंह फरार आहे. आता अमृतपाल सिंहने इन्फ्लुएंसर दीपिका लूथराला धमकी दिली आहे. दीपिकाने पोलिसांकडे तक्रार नोंदवत सुरक्षेची मागणी केली आहे. या घटनेवरून पाकिस्तानी शहजाद भट्टीने व्हिडिओ जारी करत अमृतपाल सिंहचे समर्थन केले आहे.
कमल कौरच्या हत्या प्रकरणाचा आरोपी अमृतपाल सिंह मेहरों अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. आता त्याने इन्फ्लुएंसर सिमरनप्रीत कौर उर्फ प्रीत जट्टीला धमकी दिली आहे. गाण्यांवर व्हिडिओ तयार करणे बंद कर, तुझ्याकडे केवळ 2 दिवस शिल्लक आहेत अशी धमकी प्रीत जट्टीला देण्यात आली आहे. ही धमकी मिळाल्यावर सिमरनप्रीत कौरने सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओत रडत नव्या मोबाइल क्रमांकाद्वारे कॉल करून त्रास दिला जात असल्याचे आणि धमकी देण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
मला 5 महिन्यांचे मूल आहे. मी माझ्या परिवाराचे पोषण करण्यासाठी काम करत आहे. लोकांना येऊन मदत करावी अन्यथा त्रास देणे तरी थांबवावे. माझ्यावर घराच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. धमकी देणाऱ्या लोकांनीच माझ्या घराचा खर्च उचलावा असे प्रतिआव्हान तिने दिले आहे. माझ्याकडून पूर्वी ज्या चुका झाल्या आहेत, त्याबद्दल मी माफी मागितली आहे. आता मी सूट परिधान करून व्हिडिओ तयार करते. तरीही धमकी देण्यात आल्याचे तिचे सांगणे आहे.
Comments are closed.