Install cctv conduct alcohol test on bus drivers and state governments new guidelines for schools in marathi


बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचार झाला. या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यासाठी हे नवीन नियम बनवण्यात आले.

Student Safety : मुंबई : शाळेतील विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अनिवार्य आहे. याशिवाय, दिवसभरातून तीन वेळा मुलांची हजेरी घेणे, शालेय कर्मचाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास सरकारी अनुदान रोखणे किंवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखी कारवाई केली जाऊ शकते. (install cctv conduct alcohol test on bus drivers and state governments new guidelines for schools)

बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचार झाला. या पार्श्वभूमीवर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यासाठी हे नवीन नियम बनवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 13 मे 2025 रोजी एक जीआर जारी केला. त्यानुसार, 18 वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला अल्पवयीन मानले जाईल. शाळेत कोणताही गुन्हा घडल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा बाल कल्याण पोलीस विभागला देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा – Hair Transplant : हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका इंजीनिअरचा मृत्यू, एकाच महिला डॉक्टरकडून उपचार

काय आहे राज्य सरकारची नियमावली

– सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य, कॅमेऱ्यांचे फुटेज किमान एक महिना जपून ठेवणे बंधनकारक.
– शक्य असल्यास पूर्व-प्राथमिक ते इयत्ता सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती.
– कर्मचाऱ्यांची कसून तपासणी, आवश्यक असल्यास चारित्र्य प्रमाणपत्र घ्या.
– बसचालकासह इतर कर्मचाऱ्यांची नियमितपणे अल्कोहल चाचणी करणे आवश्यक आहे.
– प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी अनिवार्य
– शाळेच्या आवारात 1098 हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक भागात लावावा.
– मुले शाळेत गैरहजर असतील, तर मेसेजद्वारे त्यांच्या पालकांना सूचना द्यावी.
– मानसिक दबावाखाली असलेल्या किंवा त्रासलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन
– लहान मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ बद्दल माहिती द्यावी.



Source link

Comments are closed.