कामगार औद्योगिक न्यायालयासाठी जागा द्या, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

अपुरी जागा, पुरेशा सोयी सुविधांचा अभाव यामुळे वकिलांची तसेच याचिकाकर्त्यांनी गैरसोय होत असून भाडय़ाच्या इमारतीत सुरू असलेल्या कामगार, औद्योगिक न्यायालयासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश द्या अशी मागणी करत वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत सरकारला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

सोलापूरमधील कामगार औद्योगिक न्यायालयाचा कारभार भाडय़ाच्या इमारतीत सुरू असून या इमारतीत सोयीसुविधांची वानवा आहे. 1972 सालापासून वापरात असलेली सध्याची भाडय़ाची इमारत जीर्ण झाली असून लिफ्ट आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे महिला याचिकाकर्त्या, वकील आणि अपंग व्यक्तींसाठी ते अडचणीचे ठरत आहे. वाहनांच्या पार्ंकगसाठी जागा नाही. त्यामुळे, नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी जागा देण्याचे निर्देश हायकोर्टाने जिल्हाधिकारी यांना द्यावेत अशी मागणी करत लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.

Comments are closed.