Chandrpur: भाजपमध्ये प्रचंड गोंधळ! प्रदेशाध्यक्षांची उमेदवार यादी महानगर अध्यक्षाने बदलली, कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवले

उमेदवार यादी घोटाळ्यानंतर भाजप चंद्रपूर शहर अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेली अंतर्गत कलह

महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये जणू यादवी माजल्यासारखी स्थिती झाली आहे. संभाजीनगर, नाशिक पाठोपाठ चंद्रपूरमध्ये देखील भाजपमधील उमेदवारीवरून प्रचंड गोंधळ उडाला आहे. चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी कासनगोट्टुवार यांनी आपल्याच मताने बदलून दहापेक्षा अधिक उमेदवार बदलून टाकले. प्रदेशाध्यक्षांचा हा अवमान असल्याने पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि आता त्यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात आल्याचे पत्र जारी केले.

प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे पत्र जारी केले आहे. वर्षभरापूर्वीच कासनगोट्टुवार यांची या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध पक्षात झाला होता. त्यांच्या कारवाया नेहमीच पक्षात वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांचे शहाणपण आणि आगाऊचे धाडस त्यांच्या अंगलट आल्याची प्रतिक्रिया पक्षात उमटत आहे. ऐन निवडणुकीत भाजपमध्ये सुरू असलेला हा गोंधळ पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

भाजपचे पत्र

Comments are closed.