आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरण: डॉ. रवींद्रपाल सिंगच्या जामिनावर ‘तारीख पे तारीख’; 4 मार्चच्या सुनावणीकडे लक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड येथील रोशन कुळे याच्या किडनी विक्रीतून उघडकीस आलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरणाने संपूर्ण देश हादरवून सोडला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याच्या जामीन अर्जावर सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत असल्याने सध्या ‘तारीख पे तारीख’ असे चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत या जामीन अर्जावर तब्बल दहा वेळा सुनावणी झाली असून, आता सर्वांच्या नजरा 4 मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड येथील रोशन कुळे याच्या किडनी विक्रीतून उघडकीस आलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याच्या जामीन अर्जावर सुनावणी सातत्याने लांबत असल्याने ‘तारीख पे तारीख’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या जामीन अर्जावर दहा वेळा सुनावणी झाली असून, आता ४ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणात रोशन कुळे याची किडनी कंबोडिया येथे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान भारतातील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटल येथे डॉ. रवींद्रपाल सिंग व डॉ. राजरत्नम गोविंदसामी यांनी किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्याचेही समोर आले आहे.

अटकेपासून बचावासाठी डॉ. सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांना आतापर्यंत दोन वेळा अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर कायदेशीर मुद्द्यांमुळे निर्णय प्रलंबित राहिला आहे. दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवादासाठी वेळ मागितला जात असल्याने सुनावणी पुढे ढकलली जात आहे.

राज्य सरकारची अधिसूचना

डॉ. सिंग यांच्या वकिलांनी ‘थोटा’ (THOTA) कायद्यांतर्गत पोलिस तपासावर तांत्रिक आक्षेप घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी राज्य सरकारकडे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची मागणी केली होती. त्यानुसार 17 फेब्रुवारीला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने 24 फेब्रुवारी रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे तपासाला कायदेशीर बळ मिळाले असून, आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, या जामीन अर्जावर 22 जानेवारी 2026 रोजी पहिली सुनावणी झाली होती. त्यानंतर 23 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 4, 5, 9,10, 18 आणि 24 फेब्रुवारी अशा एकूण दहा सुनावण्या पार पडल्या आहेत. आता 4 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Comments are closed.