ईदसाठी घरी चाललेल्या मजुरांवर काळाचा घाला, ट्रक उलटल्याने 15 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ईद साजरी करण्यासाठी चाललेल्या मजुरांवर वाटेतच काळाने घाला घातला. ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे बांगलादेशात घडली. अपघातात अन्य 10 जण जखमी झाले आहेत. ढाकापासून 83 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला. बहुतेक जण रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. ट्रक चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे मध्य बांगलादेशातील एका प्रमुख महामार्गावर लोखंडी सळ्या आणि अतिरिक्त प्रवाशांनी भरलेला एक ट्रक उलटला. यात किमान 15 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले.

गुरुवारी ईद-उल-अझहा सणाच्या सुट्टीनिमित्त उत्तरेकडील भागाकडे निघालेल्या प्रवाशांनी ढाका येथून लिफ्ट घेतली होती. ट्रक उलटला आणि त्यात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.