अफगाणिस्तान भूकंपाने हादरले; 20 जण ठार

अफगाणिस्तान सोमवारी भूकंपाने हादरले. मजार-ए-शरीफमध्ये झालेल्या भूकंपात कमीत कमी 20 जणांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मजार-ए-शरीफजवळ आहे. मजार-ए-शरीफमधील प्रसिद्ध निळी मशिदेचा काही भागही भूकंपात कोसळला आहे. या भूकंपामुळे बल्ख, समांगन आणि बगलान प्रांतात जोरदार हादरे बसले. अफगाणिस्तानात ऑगस्टमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

Comments are closed.