यमनमध्ये स्फोट, 23 हिंदुस्थानींना वाचवण्यात यश

यमनच्या अदन किनाऱ्यावर समुद्रात झालेल्या स्फोटात 24 पैकी 23 हिंदुस्थानी नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे, तर एक नागरिक अजून बेपत्ता आहे. ही दुर्घटना एमव्ही फाल्कनमध्ये गॅस टँकरमध्ये स्फोट झाल्याने घडली. हे जहाज ओमानच्या सोहार बंदराहून रवाना होऊन जिबूतीकडे जात होते. त्याच वेळी टँकरमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर 24 क्रू सदस्यांनी जहाजाला सोडून समुद्रात उड्या मारल्या होत्या. यानंतर 23 नाविकांना सुरक्षित वाचवले आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे.
Comments are closed.