स्पेनमध्ये 25 वर्षीय महिलेला इच्छामरणाची परवानगी
स्पेनमध्ये 25 वर्षीय महिला नोएलिया कास्टिलोला इच्छामरणाची परवानगी मिळाली आहे. या इच्छामरणामुळे देशभरात या मुद्द्यावरून वादविवाद होत आहे. नोएलियाने इच्छामरणासाठी कायदेशीर लढाई लढली होती. कास्टिलो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला व्हीलचेअरवर यावे लागले होते. शारीरिक समस्या वाढल्याने तिने इच्छामरणासाठी कायदेशीर लढाई लढली. अखेर तिला बार्सिलोनामध्ये जीवन संपवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नोएलियाच्या या निर्णयाला कुटुंबातील व्यक्तींनी विरोध केला होता.
Comments are closed.