मेक्सिकोतील हिंसाचारात 73 जणांचा मृत्यू; 25 सुरक्षा रक्षकांचाही समावेश, एल मेंचोच्या खात्म्यानंतर अनेक ठिकाणी तणाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एल मेंचो या जगातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्कराचा खात्मा केल्यानंतर मेक्सिकोमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेंचोच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू केला. त्यात विविध शहरांमध्ये 73 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात मेक्सिकोच्या 25 सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मेक्सिकोचे संरक्षण मंत्री रिकार्डो ट्रेव्हिला यांनी सांगितले, की मेंचोवर केलेल्या कारवाईदरम्यान त्याच्या 8 साथीदारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मेंचोला त्याचे सुरक्षा रक्षक जवळच्या जंगलात घेऊन गेले. तेथेही मोठी चकमक उडाली. त्यात ते गंभीर जखमी झाले. या सर्वांचा मेक्सिको सिटीला नेताना वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून 20 राज्यांमध्ये मेंचोच्या साथीदारांनी ठिकठिकाणी जाळपोळ, वाहनांची तोडफोड केली. मेक्सिकोतील बहुतांश शाळा सुरक्षेमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशाराही दिला आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लाऊडिया शिनबाम यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

प्रेयसीवर लष्कराची पाळत, असा सापडला मेंचो

एल मेंचोवर 136 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस होते. मेक्सिकोच्या लष्कराने त्याच्या प्रेयसीवर अनेक दिवसांपासून पाळत ठेवली होती. तिच्या माध्यमातूनच त्याचा शोध लागला आणि लष्कराने मोहीम राबवत त्याचा खात्मा केला. लष्कराने सर्वप्रथम त्याच्या प्रेयसीच्या एका विश्वासू साथीदाराची ओळख पटवली. तो तिला जालिस्को शहरात एका ठिकाणी घेऊन गेला. लष्कराने तिचा पाठलाग केला. मेंचो या ठिकाणी कंपाउंडच्या आत असल्याची खात्री झाल्यानंतर मोहीम सुरू केली.

Comments are closed.