Baloch Attack on Pak Army – बलुच विद्रोह्यांचा पाकिस्तानी लष्करावर हल्ला, अनेक सैनिक ठार

बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला. बलुचिस्तानमधील मंगोचर शहरात शनिवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या ताज्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार झाले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बॉम्बस्फोटात ताफ्यातील अनेक वाहनांना लक्ष्य करण्यात आले.

लतीफ बलोचची हत्या पाकिस्तानी लष्कराशी संबंधित मिलिशियाने केल्याचा आरोप बलुच नेत्यांनी केला आहे. लतीफ बलोच हा पाकिस्तानातील आघाडीची वृत्तवाहिनी आज न्यूजशी संबंधित होता. लतीफ नियमितपणे बलोच मानवाधिकार आणि स्थानिक दडपशाहीवर वृत्तांकन करत होता. अहवालानुसार, पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने एका सशस्त्र पथकाने बलोचच्या घरात घुसून त्याला गोळ्या घालून ठार मारले.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ऑपरेशन सिंदूरमुळे पराभूत झालेले पाकिस्तानी सैन्य आता बलुच बंडखोरांना लक्ष्य करत आहे. प्रत्युत्तरादाखल, बीएलएनेही हल्ले वाढवले​आहेत. पाकिस्तानी सैन्य स्थानिक लोकांचे अपहरण करून त्यांना मारहाण करते. त्यांना गायब करतात. तसेच याची तक्रार करणाऱ्या लोकांवरही हल्ले केले जात आहेत. यामुळे संतप्त झालेले बीएलए आणि इतर बंडखोर गट आता थेट लष्कराला लक्ष्य करत आहेत.

Comments are closed.