बहामासमध्ये फ्लेमिंगोच्या विमानाला अपघात, 10 जणांचा मृत्यू; एअरलाइन्सची सर्व उड्डाणे स्थगित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बहामासच्या सॅन अँड्रॉस येथे फ्लेमिंगोच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर विशेष सतर्कता बाळगण्यात आली असून ‘फ्लेमिंगो एअर’ची सर्व उड्डाणे तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. नासाऊच्या पश्चिमेकडील नॉर्थ अँड्रॉस भागात शुक्रवारी, 10 जुलैला विमान अपघाताची घटना घडली आणि विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

बहामासचे लोक स्वातंत्र्याचा 53 वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाच विमान अपघाताची घटना घडली. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे. बहामासचे पंतप्रधान फिलिप ब्रेव्ह डेव्हिस यांनी अपघाताबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. विमान अपघातातून एक व्यक्ती वाचली होती; मात्र उपचारादरम्यान त्या जखमी व्यक्तीचाही मृत्यू झाला, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

ही दुर्घटना घडली तेव्हा बहामासचे लोक स्वातंत्र्याचा 53 वा वर्धापन दिन साजरा करत होते. अपघातग्रस्त विमान नासाऊ येथील लिंडन पिंडलिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सॅन अँड्रॉसच्या दिशेने जात असताना अचानक खाली कोसळले. बहामासमध्ये नोंदणीकृत असलेले हे विमान ‘सेसना 402’ (Cessna 402) या प्रकारातील होते. लागोपाठच्या अपघाताच्या घटनांनी विमान प्रवासी सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

Comments are closed.