USA Firing – अमेरिकेत फुटबॉल सामन्यानंतर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू; 12 जखमी

अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात फुटबॉल सामन्यानंतर शाळेजवळ अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांना एअरलिफ्ट करून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू आहे आणि घटनेचे कारण शोधले जात आहे, असे महापौर जॉन ली यांनी सांगितले.
वॉशिंग्टन काउंटीमधील मिसिसिपीतील लेलँड या छोट्या शहरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. गर्दीच्या वेळी लेलँडच्या मुख्य रस्त्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सखोल तपास करत आहेत.
Comments are closed.