Italy Car Accident – इटलीत भीषण अपघातात चार हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू

इटलीत भीषण अपघातात चार हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कारने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला. मनोज कुमार, सुरजीत सिंह, हरविंदर सिंह आणि जसकरण सिंह अशी मयतांची नावे आहेत. दक्षिण इटलीतील मटेरा शहराच्या स्कॅनजानो जोनिको नगरपालिका क्षेत्रात ही घटना घडली.
अधिक तपशील मिळविण्यासाठी स्थानिक इटालियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत. संबंधित कुटुंबांना दूतावास सर्व शक्य कॉन्सुलर मदत करेल, असे हिंदुस्थानी दूतावासाने सांगितले. अपघातात अन्य जखमींपैकी पाच जणांना पोलिकोरो (माटेरा) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर सहाव्या गंभीर जखमीला पोटेंझा येथील सॅन कार्लो रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Comments are closed.