ब्रिटनमध्ये चाकू आणि कार हल्ल्यात चार जण जखमी; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार

ब्रिटनमध्ये चाकू हल्ला आणि कार हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला. याप्रकरणी एका संशयिताला गोळ्या घालून ठार मारण्यात आले, असे ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहराच्या उत्तरेकडील क्रम्पसॉल येथील एका सिनेगॉगजवळ क्रम्पसॉलमध्ये ही घटना घडली. क्रम्पसॉलमधील मिडलटन रोडवरील हीटन पार्क हिब्रू काँग्रेगेशन सिनेगॉग येथे सकाळी 9.31 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका नागरिकाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयित आरोपीवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
Comments are closed.