बेरोजगारीला कंटाळून हिंदुस्थानी तरुणाने अमेरिकेत जीवन संपवलं, कर्जबाजारी पिता मुलाच्या मृतदेहाच्या प्रतिक्षेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेरोजगारीला कंटाळून हिंदुस्थानी तरुणाने अमेरिकेत जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. इरागनाबोयिना चंदू असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे. चंदूच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, चंदूने शिकागो येथील डिपॉल युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. कुटुंबावर अवलंबून रहावे लागत असल्याने चंदू मानसिक तणावात होता. चंदूचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आणि कुटुंबावर पडणारा आर्थिक भार यामुळे तो विवंचनेत होता. याच नैराश्यातून त्याने आपल्या अमेरिकेतील निवासस्थानी टोकाचे पाऊल उचलले.

चंदूचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी मोठ्या निधीची गरज असून, यासाठी अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी 1,20,000 डॉलर्स गोळा करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 60, 000 डॉलर्स जमा झाले आहेत.

Comments are closed.