अमेरिकेत अपघातात हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी, मृतदेह मायदेशी आणण्यासाठी कुटुंबाची मदतीची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील मिसूरी येथे रस्ते अपघातात एका हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी झाली आहे. दारम सुप्रिया (31) असे मयत महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे 2.20 च्या सुमारास हा अपघात झाला. सुप्रिया ही मूळची तेलंगणा येथील रहिवासी असून तिचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी कुटुंबाने मदतीची मागणी केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट लुईस येथील एका रेस्टॉरंटमधील काम संपवून सुप्रिया एका मैत्रिणीसोबत कारने घरी परतत होत्या. यादरम्यान, एका ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. यात सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मैत्रिण गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुप्रिया या पती आणि अडीच वर्षाच्या मुलासह अमेरिकेतील मिसुरी येथे राहत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी त्यांचे वडील दारम श्रीनिवास यांनी सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

Comments are closed.