गाझावर 153 टन बॉम्ब टाकले – नेतन्याहू

इस्रायली सैन्याने गाझावर 153 टन बॉम्ब टाकले आहेत, अशी माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी संसदेत दिली. ‘हमास’ने युद्धबंदी मोडल्याचा बदला म्हणून ही कारवाई केल्याचे ते म्हणाले. ‘आपल्या एका हातात शस्त्रे आहेत आणि दुसऱ्या हातात शांततेचा प्रस्ताव आहे. शांततेची चर्चा बरोबरीच्या लोकांशी केली जाते, दुर्बलांसोबत नाही. इस्रायल आता पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे, असेही नेतन्याहू म्हणाले.
Comments are closed.