आखाती देशांत 10 वी, 12 वीच्या परीक्षा रद्द
आखाती देशांत युद्ध सुरू असल्याने सीबीएसईने 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसईने यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात म्हटले की, 10 वीच्या 7 मार्च ते 11 मार्चपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब आणि यूएईमध्ये सीबीएसईच्या परीक्षा होणार नाहीत. 2 मार्च, 5 मार्च आणि 6 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, परंतु आता या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात राहावे, असा सल्ला सीबीएसईने दिला आहे.
Comments are closed.