नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी

सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत. यालुंग री शिखरावर ही दुर्घटना घडली. शिखराच्या बेसकॅम्पवर हिमस्खलन झाले. चार जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. हे शिखर बागमती प्रांतातील दोलखा जिल्ह्यातील रोलवालिंग खोऱ्यात आहे. मृतांमध्ये तीन अमेरिकन नागरिक, एक कॅनेडियन, एक इटालियन आणि दोन नेपाळी नागरिकांचा समावेश आहे, असे जिल्हा पोलीस कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक ज्ञानकुमार महातो यांनी सांगितले.

Comments are closed.