व्हिएतनामच्या हनोईमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; 6 जण ठार, 14 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

व्हिएतनामच्या हनोईमधील एका हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी पहाटे गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जण ठार झाले, तर 10 जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेत 14 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. स्फोटामुळे परिसरातील घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोटामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या, भिंतींना तडे गेले आणि धातूचे शटर उखडून बाहेर फेकले गेले. छताचे पत्रे आणि शेड कोसळले. स्फोट इतका शक्तिशाली होता की, शेजारील निवासी इमारतीही हादरल्या.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस शोध उपकरणांच्या मदतीने बचावकार्य करत आहेत. काँक्रीटचे स्लॅब उचलण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रणेचा वापर केला जात आहे. स्फोट झाला तेव्हा रेस्टॉरंटमध्ये गर्दी होती, असे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने शेजारील इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Comments are closed.