आनंद अंतराळात मावेना, 8 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार

केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेलेले ‘नासा’चे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे तब्बल आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेत, मात्र आता ते 19 मार्च रोजी पृथ्वीवर परतणार आहेत.
‘नासा’ आणि स्पेसएक्सने क्रू 10 ही मोहीम लाँच केली आणि क्रू 10 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले. तेव्हा सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांनी गळाभेट घेऊन आनंद साजरा केला. याचा व्हिडीओ नासाने शेअर केला आहे. हा खूपच सुंदर दिवस आहे, असे सांगत सुनीता यांनी या क्षणाचे फोटोही टिपले आहेत. बोइंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत.
Comments are closed.