US Firing – मिशिगनच्या डेट्राईट शहरात स्ट्रिप क्लबमध्ये गोळीबार; तिघे ठार, चौघे जखमी
अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात स्ट्रिप क्लबमध्ये गोळीबराची घटना घडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले. सुरवातीला क्षुल्लक वाद झाला. हळूहळू या वादाचे हाणामारीत आणि मग गोळीबारात रुपांतर झाले. मयत आणि जखमी सर्व जण 20 ते 30 वयोगटातील आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर 7.21 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना खासगी वाहनांतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
पोलीस प्रमुख बेटिसन यांच्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये झालेल्या वादानंतर हा गोळीबार झाला. हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला याचा पोलीस तपास करत आहेत.
Comments are closed.