Turkey Plane Crash – बालिकेसिरजवळ पेट्रोलिंग दरम्यान लढाऊ विमान कोसळले, पायलटचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तुर्कीतील बालिकेसिरजवळ हवाई गस्त दरम्यान मंगळवारी मध्यरात्री तुर्की हवाई दलाचे एफ-16 लढाऊ विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. बुर्सा-इझमीर महामार्गाजवळ ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलीस पथकांसह आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

अपघाताचे कारण अद्याप समोर आलं नाही. अपघाताबाबत तपास सुरू केला आहे. एफ-16 फायटिंग फाल्कन हे एकल-इंजिन आणि सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. हे विमान बालिकेसिरमधील 9व्या मेन जेट बेस कमांडला देण्यात आले होते. मंगळावरी रात्री 12.56 वाजता टेकऑफ केल्यानंतर लगेचच रेडिओ संपर्क आणि रडार ट्रॅकिंग तुटले. यानंतर विमानाचा शोध सुरू करण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान विमान कोसळल्याचे आणि पायलटचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. अपघात तपास पथकाकडून करण्यात येणाऱ्या चौकशीनंतर अपघाताचे कारण निश्चित केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments are closed.