तुर्कीचे लष्करी मालवाहू विमान जॉर्जियामध्ये कोसळले, बचाव कार्य सुरू

तुर्कीचे लष्करी मालवाहू विमान जॉर्जियामध्ये कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. या विमानात 20 सैनिक असल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत घटनेची माहिती दिली.
तुर्की लष्कराच्या C-130 विमानाने मंगळवारी अझरबैजानहून उड्डाण केले. ते तुर्कीला परत जात असतानाच जॉर्जियन सीमेजवळ लष्करी मालवाहू विमान कोसळले. विमानात एकूण 20 सैनिक होते. अझरबैजान आणि जॉर्जियन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

Comments are closed.