अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी

अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. नॉर्थ कॅरोलिनात विकेंड पार्टीदरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून 150 हून अधिक लोकांनी पळ काढत आले प्राण वाचवले. मृत आणि जखमींची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
ही घटना दक्षिण कॅरोलिनाच्या सीमेजवळील उत्तर कॅरोलिनातील मॅक्सटन येथे घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत, असे रोबेसन काउंटी शेरीफ बर्निस विल्किन्स यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Comments are closed.