दारु प्या आणि सुट्टी घ्या, कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी कंपनीची अनोखी ऑफर

नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी आणि कार्यालयात आरामदायी वातावरण निर्माण करण्यासाठी यासाठी जपानमधील कंपनीने अनोखी ऑफर दिली आहे. ओसाकास्थित ट्रस्ट रिंग कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी मद्यपान करून हँगओव्हर रजा घेण्यास कंपनी सांगत आहे.

ट्रस्ट रिंग कंपनी कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे पेये पुरवते. तसेच कर्मचाऱ्यांना 2-3 तासांची हँगओव्हर रजा देखील देते. कंपनी सुरुवातीला 1 लाख 27 हजार रुपये वेतन देते. शिवाय कर्मचाऱ्यांना 20 तासांचा ओव्हरटाईमही देते.

कंपनीचे सीईओ काय म्हणाले?

मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत ट्रस्ट रिंगचे मर्यादित बजेट पाहता, आम्ही कामाच्या ठिकाणी अद्वितीय आणि आल्हाददायी वातावरण ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही पगाराबाबत इतर कंपन्यांशी तुलना करू शकत नाही. मात्र कर्मचाऱ्यांना आरामदायी आणि मजेशीर वातावरण प्रदान करू शकतो. यामुळे कर्मचारी आमच्यासोबत जोडले जातील, असे ट्रस्ट रिंगचे सीईओ म्हणाले. कंपनीचे सीईओ देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मद्यपान करतात.

Comments are closed.