अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात महिलेचे आक्षेपार्ह वर्तन; मियामी विमानतळावर पोलिसांनी घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बाल्टिमोरहून मियामी येथे जाणाऱ्या अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात विचित्र घटना घडली. प्रवासादरम्यान एका महिलेने कथितरीत्या तिचे कपडे उतरवत सहप्रवाशांसमोर आक्षेपार्ह वर्तन केले. विमान मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच सदर महिलेला ताब्यात घेण्यात आले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाईन्सचे AA1779 हे विमान 11 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास बाल्टिमोर विमानतळावर मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले. संबंधित महिला 9डी या सीटवर बसली होती. प्रवासादरम्यान महिलेने कपडे उतरवण्यास आणि अश्लील वर्तन करण्यास सुरवात केली. फ्लाईट अटेंडंटने कॉकपीट क्रू ला याबाबत माहिती दिली.

क्रू ने अमेरिकन एअरलाईन्सच्या इंटिग्रेटेड ऑपरेशन्स सेंटरशी संवाद साधत एसीएआरएस (ACARS) संदेशाद्वारे घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, फ्लाईट क्रूने कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचित करण्याची आणि विमान मियामीला पोहोचल्यावर त्यांना तिथे उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार, कायदा अंमलबजावणी करणारे अधिकारी गेटवर उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.23 वाजता विमान मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान उतरताच संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले.

Comments are closed.