बंजी जंपिंग जीवावर बेतले, दोरी न बांधता पुलावरून फेकले; अॅडव्हेंचर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तरुणीचा मृत्यू
बंजी जंपिंग करणे एका 24 वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतले आहे. अॅडव्हेंचर कंपनीने बंजी कॉर्ड न बांधताच तरुणीला 35 मीटर उंचीवरून फेकले. यात तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथे ही घटना घडली. अपघातानंतर कर्मचारी घाबरले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना पकडले. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.
एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मारिया एडुआर्डा रॉड्रिग्स डी फ्रेटास असे मयत तरुणीचे नाव आहे. साओ पाउलो राज्यातील लिमेरा आणि कॉर्डेरोपोलिस शहरांना जोडणाऱ्या ‘पोंटे दो एस्कालाटो’ या पुलावर हा अपघात घडला. हा पूल जवळपास तीन दशकांपासून बंद आणि पडीक होता, परंतु अलीकडेच तो साहसी उत्साही आणि पर्यटकांचे एक आवडते ठिकाण बनला आहे. या ठिकाणी कोणतेही सरकारी किंवा अधिकृत देखरेख किंवा सुरक्षा नियम लागू नाहीत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मृत मारियाने बंजी जंप आणि व्हिडिओची बनवण्यासाठी ‘एंत्रे कॉर्डास’ नावाच्या एका खाजगी कंपनीला अंदाजे 290 डॉलर्स (सुमारे 24,500 रुपये) दिले होते. मात्र हा आपला शेवटचा व्हिडिओ ठरेल याची तिला कल्पनाही नव्हती. जंप करण्यापूर्वी क्रू सदस्यांनी साधी सुरक्षा तपासणीसुद्धा केली नाही. जंप कॉर्ड बांधताच उडी घेतल्याने ती 35 मीटर उंचीवरून जमिनीवर कोसळली. मुलगी खाली पडल्यानंतरच कंपनीच्या प्रशिक्षकांना आपली भयंकर चूक लक्षात आली.
Comments are closed.