हरियाणाच्या दोन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा निलंबित
गुरुग्राम:
19 वर्षीय शिक्षिकेच्या मृत्यूवरून तणाव निर्माण झाल्याचे पाहून हरियाणा सरकारने मंगळवारी भिवानी आणि चरखी दादरी जिल्ह्यांमध्ये 48 तासांसाठी मोबाइल इंटरनेट, बल्क एसएमएस आणि डोंगल सेवा निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. भिवानी आणि चरखी दादरी जिल्ह्यात निदर्शने, आंदोलन, सार्वजनिक आणि खासगी संपत्तीला नुकसान तसेच शांतता भंग होण्याची भीती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे सांगणे आहे.
Comments are closed.