पोस्ट ऑफिसची ‘ही’ आहे भन्नाट योजना, कमी काळात अधिक फायदा, पैसे डबल करण्याची मोठी संधी
पोस्ट ऑफिस योजना: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोक विविध ठिकाणी विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. दरम्यान, गुंतवणूक करताना दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, एक म्हणजे आपण गुंतवणूक करत असलेली सुरक्षीत आहे का? आणि मिळणारा परतावा, या गोष्टी महत्वाच्या आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते. तुम्हाला जर कमी काळात अधिक परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्टाच्या किसान विकास पत्र (KVP) या योजनत गुंतवणूक करु शकता. जाणून घेऊयात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती.
सुरक्षित आणि स्थिर परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना जोखीम न घेता त्यांचे पैसे वाढवायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक आदर्श योजना आहे. तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर किसान विकास पत्र ही योजना चांगली आहे. आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु बहुतांश पर्यायांमध्ये जोखीम असते. अशा परिस्थितीत, ज्यांना 100 टक्के सुरक्षितता आणि त्यांच्या गुंतवणुकीवर हमी परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) योजना एक आदर्श पर्याय आहे. ही योजना 115 महिन्यांत (9 वर्षे आणि 7 महिने) तुमचे पैसे दुप्पट करण्याची हमी देते.
किसान विकास पत्र योजनेची वैशिष्ट्ये काय?
निश्चित परतावा
KVP योजना सध्या 7.5 टक्के वार्षिक व्याज देते. या दराने तुमची गुंतवणूक 115 महिन्यांत दुप्पट होईल.
किमान आणि कमाल गुंतवणूक
या योजनेत तुम्ही 1,000 पासून गुंतवणूक सुरु करु शकता. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. ही लवचिकता लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरते.
KVP योजनेत खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
आधार कार्ड
वय प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
KVP अर्ज फॉर्म
कोणतीही प्रौढ व्यक्ती, मग एकल किंवा संयुक्त खाते, हे खाते उघडू शकते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतात. मात्र, अनिवासी भारतीय या योजनेसाठी पात्र नाहीत.
मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा
गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला पैशांची गरज असल्यास, तुम्ही खाते उघडल्यानंतर 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर पैसे काढू शकता. खातेदाराचा मृत्यू किंवा न्यायालयाचा आदेश यासारख्या विशेष परिस्थितीत मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे.
किसान विकास पत्र योजना का निवडावी?
100 टक्के सरकारी हमी
तुमच्या पैशाला कोणताही धोका नाही.
दीर्घकालीन फायदे
ही योजना गुंतवणूकदारांना निश्चित कालावधीत दुप्पट परतावा देते.
खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी
KVP खाते उघडण्याची आणि ऑपरेट करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
सुरक्षित आणि स्थिर परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना जोखीम न घेता त्यांचे पैसे वाढवायचे आहेत त्यांच्यासाठी हे आदर्श आहे. तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर किसान विकास पत्र ही तुमची प्राथमिकता असू शकते.
अधिक पाहा..
Comments are closed.