‘या’ 6 IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी, वाचा सविस्तर…
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना वर्षाचा शेवट गोड करण्याची नामी संधी आहे. ही संधी तुमच्या हातातून निसटली तर पैसे कमावण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण 23 डिसेंबर रोजी एक दोन नव्हे तर 6 आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत संपणार आहे.
सोमवारी म्हणजेच 23 डिसेंबरला एकून 6 आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत संपणार आहे. हे सहा आयपीओ म्हणजेच Dam Capital Advisors, Transrail Lighting, Mamata Machinery, Sanathan Textiles Limited, New Malayalam Steel Limited आणि Concord Enviro System Limited होय. या सहा आयपीओंमध्ये गुंतवणुक करण्याची मुदत सोमवारी संपणार आहे.
DAM Capital Advisors या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येक शेअर्सचा किंमत पट्टा 269 रुपये ते 283 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरचे मुल्य 160 रुपये इतके आहे. त्यानंतर Transrail Lighting या आयोपीओच्या प्रत्येक शेअरचा किंमत पट्टा 410 ते 432 रुपये इतकी आहे. तसेच ग्रे मार्केटमधील शेअरचे मुल्य 175 रुपये प्रती शेअर इतके आहे. Mamata Machinery या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येक शेअरचा किंमत पट्टा 230 रुपये ते 243 रुपये प्रति शेअर आणि ग्रे मार्केटमध्ये प्रति शेअर 260 रुपये आहे.
Sanathan Textiles Limited या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या शेअरचा किंमत पट्टा 305 रुपये ते 321 रुपये प्रति शेअर असून ग्रे मार्केटमध्ये या शेअरची किंमत 40 रुपये इतकी आहे. New Malayalam Steel Limited या आयपीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी शेअरची किंमत 85 ते 90 रुपये प्रति शेअर इतकी असून ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 30 रुपये प्रति शेअर इतकी आहे. तसेच Concord Enviro Systems Limited या आयपीओमध्ये गुंतवणुक करायची असल्यास शेअरचा किंमत पट्टा 665 रुपये ते 771 रुपये इतकी आहे. तसेच ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची किंमत 40 रुपये प्रति शेअर इतकी आहे.
(टीप – ही फक्त माहिती असून आम्ही कोणताही शेअर खरेदी किंवा विक्रीचा सल्ला देत नाही.)
Comments are closed.