फ्लिपकार्टचा ग्राहकांना धोका? स्वस्तात खरेदी केलेल्या iphones च्या ऑर्डर कॅन्सल केल्या, नेमकं


मोठा अब्ज घोटाळा: Flipkart च्या Big Billion Day Sale ची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. यावर्षी सेलमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली ऑफर म्हणजे iPhone 16 आणि iPhone 16 Pro वरील सवलत होती. कमी किमतीत आयफोन मिळण्याची संधी मिळत असल्याने हजारो ग्राहकांनी ऑर्डर दिल्या. पण काही तासांतच त्या ऑर्डर रद्द होत असल्याने Flipkart वर “स्कॅम” चे आरोप होत आहेत.

आकर्षक किंमतीवर विक्रीचे आमिष

Flipkart ने सेलमध्ये iPhone 16 (128GB) ₹51,999 तर iPhone 16 Pro (128GB) ₹69,999 ला उपलब्ध असल्याचे जाहीर केले. हा दर ऐकून ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली. २२ सप्टेंबरला Flipkart Black आणि Plus सदस्यांसाठी सेल सुरू झाला, तर २३ सप्टेंबरपासून सर्वांसाठी खुला झाला.

ऑर्डर दिल्या, पेमेंटही केले… पण नंतर रद्द

काही ग्राहकांनी अर्ध्या रात्रीच ऑर्डर दिल्या. पूर्ण पेमेंट करून कन्फर्मेशनही मिळाले. मात्र, काही तासांत Flipkart ने त्या ऑर्डर रद्द केल्या. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला.

सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

या घटनेनंतर सोशल मीडियावर Flipkart विरोधात संताप व्यक्त होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “तीन पूर्ण पेमेंट ऑर्डर दिल्या होत्या, पण चार तासांत सगळ्या रद्द झाल्या. हा घोटाळाच आहे.” तर दुसऱ्याने तक्रार केली, “ऑर्डर यशस्वी झाल्या होत्या, पण सकाळी कोणतंही कारण न देता रद्द केल्या. Flipkart ग्राहकांची थट्टा करत आहे.”

काहींना शिपमेंट, काहींना नकार

काही Plus सदस्यांनी त्यांची ऑर्डर शिप झाल्याचे सांगितले आहे. मात्र, डिलिव्हरी अजून झालेली नाही. त्याउलट अनेकांनी ऑर्डर रद्द झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे Flipkart कडून नेमकं काय घडतंय, याबद्दल पारदर्शक माहिती दिली जात नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करत आहेत.या समस्येचा सामना फक्त अॅपल खरेदीदारांनाच करावा लागला नाही – गुगल पिक्सेल 9, नथिंग फोन 3 आणि आयफोन 14 खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांनीही काही मॉडेल्सवर अशाच प्रकारच्या रद्दीकरणांची आणि अचानक किमतीत वाढ झाल्याची तक्रार केली.

अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही

Flipkart कडून या वादावर अधिकृत निवेदन आलेले नाही. ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी आणि गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी कंपनी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ग्राहकांचा मात्र एकच सवाल “हा सेल खरंच ऑफर देण्यासाठी होता का, की फक्त गाजावाजा आणि ट्रॅफिक वाढवण्यासाठी?

आणखी वाचा

Comments are closed.