सेलमध्ये खरेदी केलेला iPhone खरा आहे की बनावट? या 3 ट्रिक्सने चेक करू शकता


आयफोन 17 लॉन्च (iPhone 17) करण्यात आलंय आणि त्यावर ई-कॉमर्स कंपन्या (Flipkart And Amazon) भरमसाठ ऑफर देत आहेत. पण सेलमध्ये (Online Sell) खरेदी केलेला iPhone खरा आहे की बनावट? हे कसं ओळखायचं? याची सोपी ट्रिक्स आपण जाणून घेऊयात..

Flipkart आणि Amazon वर मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनवर ऑफर्स सुरू आहे. पण जेव्हा महागड्या फोनची गोष्ट येते तेव्हा सगळ्यांच्या मनात भीती असते की कुणी फसवणूक तर करणार नाही ना.  पण काही सोपे मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही हे निश्चित करू शकता की तुम्हाला खरा आणि नवीन iPhone मिळाला आहे का?

सिलियर नंबर तपासा (Serial Number Check)

जेव्हा तुमचा iPhone Open-Box Delivery मधून येईल, तेव्हा सर्वप्रथम फोनच्या बॉक्सवर दिलेला Serial Number तपासा. Delivery Person तुम्हाला फोन तपासायला सांगेल, नाही सांगितलं तरीही तुम्ही हे नक्की तपासलं पाहिजे. यासाठी हा Serial Number तुम्ही Apple च्या Official Website वर टाका. तिथे तुम्हाला कळेल की फोन आधीपासून Activate आहे की नाही. जर Seller ने आधीच Activate केलेला फोन तुम्हाला दिला असेल, तर Delivery स्वीकारू नका. जर तिथे ‘Device Not Activated’ असे दिसत असेल तर याचा अर्थ फोन अगदी नवीन आहे.

मॉडेल नंबर तपासा (Model Number)

मॉडेल नंबर तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मॉडेल नंबरवरून तुम्हाला सहज कळू शकतं की तुमच्याकडे आलेला डिव्हाइस अगदी नवीन आहे की नाही. जर Model Number ‘M’ ने सुरू होत असेल तर तो बहुतेकदा नवीन फोन असतो. जर तो ‘F’ ने सुरू होत असेल तर तो Refurbished म्हणजेच पुन्हा तयार केलेला फोन असतो. ‘N’ म्हणजे Replacement Device आणि ‘P’ म्हणजे Personalized Device. तसेच Model Number च्या शेवटी ‘H/NA’ असणं आवश्यक आहे, ज्यावरून हे स्पष्ट होतं की फोन भारतात विक्रीसाठी बनवला आहे, Demo Model नाही.

IMEI नंबर मॅच होतोय का ते पाहा (Check Iphone IMEI Number)

तुम्ही तुमच्या फोनचा IMEI नंबर तपासूनही फोनची Authenticity कळवू शकता. यासाठी फोनच्या बॉक्सवर लिहिलेलं Serial Number आणि IMEI Number फोनमधील नंबरशी जुळवतंय का ते पाहा. फोन पटकन Activate करून Sign In करा आणि मग Settings मध्ये जाऊन तपासा की फोनचा IMEI Number आणि Serial Number बॉक्सवरील नंबरशी Match होतोय का नाही. जर हे नंबर जुळले, तर तुम्ही निश्चिंत राहू शकता की, तुम्हाला Box मधला तोच फोन मिळाला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.