धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय


आयफोन 17 स्क्रॅच समस्या: Apple ने iPhone 17 सिरीज लाँच केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच क्युपर्टिनो-स्थित तंत्रज्ञान कंपनीवर वापरकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समीक्षकांकडून तीव्र टीका होऊ लागली आहे. कारण iPhone 17 Pro आणि Pro Max मॉडेल्सवर अतिशय सहजपणे चरे पडत असल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, अनेकांनी या समस्येला ‘Scratchgate’ असे नाव देण्यात आले आहे.

‘Scratchgate’ नेमकं आहे तरी काय?

iPhone 17 Pro आणि Pro Max हे मॉडेल्स नवीन anodised aluminium unibody फ्रेमसह सादर करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या iPhone 16 सिरीजमध्ये वापरलेला टायटॅनियम फ्रेम यावेळी बाजूला ठेवून, Apple ने अधिक हलके डिझाइन मिळवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमचा वापर केला आहे. मात्र, वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की विशेषतः Deep Blue सारख्या गडद रंगांमध्ये हे मॉडेल्स वापरण्याच्या काही तासांतच चरे दिसू लागतात.

Bloomber चे मार्क गुरमन यांचं मत

सर्वात आधी या समस्येकडे लक्ष वेधणाऱ्यांमध्ये Bloomberg चे तंत्रज्ञान विश्लेषक Mark Gurman यांचा समावेश आहे. त्यांनी X वर पोस्ट करत “Deep Blue रंगातील iPhone 17 Pro वर सहज चरे पडत असल्याचं दिसत आहे. हे पूर्णपणे अनपेक्षित नाही. पूर्वीही गडद अ‍ॅल्युमिनियम फिनिश असलेल्या iPhone मॉडेल्सना अशाच समस्या होत्या. कदाचित याच कारणामुळे यंदा काळा रंगच नाही,” असे त्यांनी आहे.

Apple स्टोअर्समधील डेमो युनिट्सवरही चरे

खरेदीदारांनी Apple च्या स्टोअरमध्ये ठेवलेल्या डेमो युनिट्सवरही हेच निरीक्षण केलं आहे. @krips नावाच्या X वापरकर्त्याने “Apple च्या शोरूममध्ये अवघा एकच दिवस झाला, आणि iPhone 17 Pro आणि Pro Max च्या बॅकप्लेट्सवर स्पष्टपणे ओरखडे दिसत आहेत. हीच का सुरुवात आहे #Scratchgate ची?, ” असे पोस्ट करत संताप व्यक्त केलाय.

इतर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया (User feedback)

@Typhlosion23: “Apple खोटं बोलत नव्हतं वाटतं, iPhone 17 Pro खरोखरच सहज स्क्रॅच येतोय.”

@olivercollins09: ऑनलाईन फोटो पाहून नाराजी व्यक्त केली.

@WorkaholicDavid: “Tech tip: स्क्रॅचप्रोन iPhone 17 Pro पासून सावध रहा.”

@David_W_Martin: “असे दिसते की iPhone 17 Pro वर सहज स्क्रॅच पडतात.”

जेरीरीगरीथिंग ची 'टिकाऊपणा चाचणी'

प्रसिद्ध YouTube ड्युराबिलिटी रिव्ह्युअर JerryRigEverything ने दोन्ही मॉडेल्सवर चाचणी केली आहे. Bend Test (वाकवण्याची चाचणी) मध्ये फोन पास झाला. पण कॅमेऱ्याच्या आजूबाजूच्या भागावर स्क्रॅच सहज पडत असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी हेही सांगितलं की Deep Blue रंग अधिक नाजूक आहे, तर नवीन Orange रंग तुलनेने अधिक टिकाऊ वाटतो. मात्र, मागील काचेवर येणारे डाग सहज पुसता येतात, ही एक सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी काही वापरकर्त्यांचा संताप (User feedback)

@VerdeSelvans या वापरकर्त्याने “डेमो युनिटवर पहिल्याच दिवशी स्क्रॅच. अजून 24 तासही झाले नाहीत. हे टाळायचं असेल तर लगेच केस वापरा. क्वालिटीबद्दल फारच निराश आहे,” असे पोस्ट केली आहे. तर @sondesix ने “पाठीमागच्या काचेवर स्क्रॅच झाला तरी डाग सहज पुसता येतो, तेवढं बरं आहे,” असे म्हटले आहे. तर @vincyuee कडून “iPhone 17 Pro वरील ‘Scratchgate’ समस्या खरोखरच गंभीर आहे. फोन लाँच होऊन काहीच दिवस झाले, आणि Apple चा हाय-एंड फोन अशा गुणवत्तेचा असावा, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे,” असे म्हणत संताप व्यक्त केलाय.

Apple कडून अद्याप प्रतिक्रिया नाही

Apple कडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, अनेक संतप्त ग्राहक इतरांना सल्ला देत आहेत की, नवीन iPhone घेतल्यावर लगेचच केस वापरावा, अन्यथा स्क्रॅचच्या समस्येला सामोरे जावे लागेल.

आणखी वाचा

मुंबई अन् पुण्यात आयफोन 17 खरेदीसाठी झुंबड; ग्राहकांमध्ये हाणामारीही झाली, नेमके फिचर्स काय?

आणखी वाचा

Comments are closed.