iPhone चा पासवर्ड लीक झालाय? मोठं नुकसान टाळण्यासाठी ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा!
आयफोन संकेतशब्द लीक झाला: वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. जर हा पासवर्ड लीक झाला तर अकाउंटच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. Apple च्या म्हणण्यानुसार, 2022 आणि 2023 मध्ये सुमारे 2.6 अब्ज वैयक्तिक रेकॉर्ड्स धोक्यात आले होते आणि यापैकी अनेकांची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती गेली होती. त्यामुळे, जर तुमच्या iPhone वर पासवर्ड लीक झाल्याची सूचना (notification) आली, तर तात्काळ काही महत्त्वाचे पावले उचलणे आवश्यक आहे.
1. पासवर्ड तात्काळ बदला (Change password)
जर तुम्हाला डेटा लीकची सूचना (नोटिफिकेशन) मिळाली, तर त्वरित तुमचा पासवर्ड बदला. असं केल्याने तुम्ही मोठा आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसान टाळू शकता. यासाठी iPhone वर Apple Passwords App मधील Security Recommendations मध्ये जा. तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज्ड पासवर्ड्स दिसतील. त्यानंतर Change Password वर टॅप करून तुमचा पासवर्ड अपडेट करा.
2. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल करा (Two-factor authentication)
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) तुमच्या खात्यात सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडते. ते सुरु करण्यासाठी तुमच्या पासवर्ड व्यतिरिक्त अतिरिक्त पडताळणी आवश्यक असते. यामध्ये सामान्यतः तुमच्या फोन किंवा ईमेलवर कोड पाठवणे समाविष्ट असते. पासवर्ड उल्लंघन झाल्यास 2FA तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
3. अकाउंट अॅक्टिविटीची तपासणी करा (Check Account Activity)
जर तुमचा पासवर्ड लीक झाला असेल, तर लगेच तुमच्या अकाउंटमधील अॅक्टिविटीची (क्रियाशीलतेची) तपासणी करा. यामुळे तुम्हाला हे समजू शकते की तुमच्या अकाउंटमधून कोणताही संशयास्पद व्यवहार, बेकायदेशीर लॉग-इन किंवा सेटिंग्जमध्ये बदल झाला आहे का? जर काहीही संशयास्पद आढळले, तर तात्काळ योग्य ती सावधगिरीची पावले उचला.
4. पासवर्ड मॅनेजरचा वापर करा (Use Password Manager)
अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड असणे आवश्यक असते, पण अनेक वेळा सर्व पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जाते. अशा वेळी पासवर्ड मॅनेजरचा वापर करावा. पासवर्ड मॅनेजर हे एनक्रिप्टेड वॉल्टमध्ये तुमचे सर्व पासवर्ड सुरक्षितपणे साठवते, ज्यामुळे प्रत्येक अकाउंटसाठी युनिक आणि मजबूत पासवर्ड ठेवणे सोपे होते.
इतर महत्वाच्या बातम्या
iPhone Sell Online : सेलमध्ये खरेदी केलेला iPhone खरा आहे की बनावट? या 3 ट्रिक्सने चेक करू शकता
आणखी वाचा
Comments are closed.