आरसीबीच्या चाहत्यांना ‘विराट’ धक्का; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विक्रीला, आगामी हंगामापूर्वी पूर्ण होणार व्यवहार

इंडियन प्रीमियर लीग आणि वुमन प्रीमियर लीगमध्ये चषक जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ विक्रीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आगामी हंगामापूर्वी आरसीबीची विक्री होणार असून त्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रिटिश स्पिरिट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी डियाजिओ पीएलसीने 31 मार्च 2026 पूर्वी नवीन मालक शोधून संघाची विक्री केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पत्रही लिहिण्यात आले आहे.

Comments are closed.