IPL: सीएसकेचा ‘ट्रम्प कार्ड’ रवींद्र जडेजा नवा माइलस्टोन गाठण्याच्या तयारीत!
रवींद्र जडेजा हा आयपीएलमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये मानला जातो. तो केवळ उत्कृष्ट फिरकी गोलंदाज नाही तर खालच्या क्रमात महत्त्वपूर्ण धावा जोडण्याची त्याची क्षमता संघासाठी फार मौल्यवान ठरते. त्याच्या फिरकीला समजून खेळणे अनेक फलंदाजांसाठी कठीण जाते, तो आपल्या षटकांचा कोटा वेगाने पूर्ण करताना अतिशय किफायतशीर ठरतो. शिवाय, त्याचे क्षेत्ररक्षण अचूक आणि वेगवान असून, अनेकदा सामना फिरवण्याची ताकद त्याच्या झेलांमध्ये आणि थेट फेकींमध्ये असते. चेन्नई सुपर किंग्जसाठी 2025 च्या हंगामातही तो एक प्रमुख खेळाडू ठरणार आहे, कारण तो संघासाठी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये ‘ट्रम्प कार्ड’सारखा प्रभाव टाकतो.
आयपीएल 2025 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जला 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. जर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात 41 धावा करू शकला तर तो आयपीएलच्या इतिहासात त्याचे तीन हजार धावा पूर्ण करेल. आतापर्यंत त्याने 240 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 2959 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने तीन अर्धशतके केल्या आहेत.
दुसरीकडे, गोलंदाजीत, रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये एकूण 160 विकेट्स घेतल्या आहेत. आता जर त्याने 41 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये 3000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 150 पेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला खेळाडू बनेल. त्याच्या आधी आयपीएलमध्ये आजपर्यंत कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला हा मोठा विक्रम करता आलेला नाही.
रवींद्र जडेजा 2008 पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. पहिल्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. त्यानंतर त्याने संघासोबत 2008 चे आयपीएल विजेतेपदही जिंकले. यानंतर, सीएसके संघाने त्याला आयपीएल 2012 च्या लिलावात खरेदी केले. तेव्हापासून तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याने संघासाठी कर्णधाराची भूमिकाही बजावली आहे.
Comments are closed.