IPL 2025 – दिल्लीने शेवट गोड केला, पंजाबची दांडी केली गुल

दिल्लीने यंदाच्या हंगामात धमाकेदार कामगिरी केली. परंतु मागील काही सामन्यांमध्ये सलग पराभव पत्करावा लागल्यामुळे गुणतालिकेत संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेल्या दिल्लीने आयपीएलच्या अठराव्या हंगामाचा शेवट मात्र गोड केला आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दमदार सुरुवात केली. केएल राहुल (35), करुण नायर (44) आणि समिर राजी (नाबाद 58 धावा) यांनी विस्फोटक अंदाजात फलंदाजी केल्यामुळे दिल्लीने 19.3 षटकांमध्येच आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना 6 विकेटने आपल्या नावावर केला.
Comments are closed.